पोलीस निरीक्षकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मिरज येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक अजित दळवी यांच्या मुलाने राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
अभिषेक अजित दळवी (२९, रा. पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी परिसरात मयत अभिषेक हा आई आणि पत्नीसह राहत होता. तर वडील अजित दळवी हे नोकरीनिमित्त सांगली जिल्ह्यात असतात. दरम्यान, एक वर्षापूर्वी अभिषेकचं लग्न झालं होतं.

मध्यरात्री अभिषेकने मद्यपान केलं होतं. त्यानंतर त्याने बेडरूमचा दरवाजा आतून लावून घेत गळफास घेतला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/