PM-Kisan सन्मान निधी योजना : 9 कोटी शेतकऱ्यांना मिळाले 6000-6000 रुपये, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील ८ कोटी ९५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६०००-६००० रुपये पाठवण्यात आले आहेत. हे ते शेतकरी आहेत, ज्यांच्या नोंदी बरोबर आहेत आणि त्यांना योजनेचे तीन हप्ते मिळाले आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हा ३ सप्टेंबरपर्यंतचा अहवाल आहे. यूपीच्या सर्वात जास्त २,०५,३५,८१३ शेतकर्‍यांना या कॅटेगरीचा फायदा मिळाला आहे. जर तुमचा हप्ता अजून आलेला नसेल, तर pmkisan.gov.in वर जाऊन आपले स्टेटस तपासा.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल यासाठी मोदी सरकारने ही योजना सुरू केली आहे. त्यांच्यावरील दबाव कमी होईल. सरकारला जास्तीत जास्त लोकांना लाभ द्यायचा आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेंतर्गत कुटुंबाची व्याख्या पती-पत्नी आणि अल्पवयीन मुले आहेत. महसूल रेकॉर्डमध्ये ज्यांचे नाव नोंदणीकृत आहे, असा कोणताही अल्पवयीन व्यक्ती स्वतंत्रपणे त्याचा लाभ घेऊ शकतो.

याचा अर्थ असा की, जर एकापेक्षा जास्त वयस्क व्यक्तीचे नाव समान लागवडीच्या भुलेख पत्रकात नोंदवले गेले असेल, तर प्रत्येक वयस्क व्यक्ती योजनेअंतर्गत स्वतंत्र लाभासाठी पात्र ठरू शकतो. जरी तो संयुक्त कुटुंबात राहत असेल. यासाठी महसूल रेकॉर्ड व्यतिरिक्त आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक आवश्यक असेल.

स्टेटस कसे तपासायचे?

प्रथम पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. त्याच्या Farmers corner पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला PM Kisan Beneficiary Status चा पर्याय मिळेल.

तुम्हाला त्यामध्ये Beneficiary Status चा पर्याय निवडावा लागेल. आता येथे आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर वापरुन आपले स्टेटस तपासू शकता. तुमची रेकॉर्ड पडताळणी केली गेली आहे की नाही किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीचा प्रविष्ट केला गेला असेल तर याची माहिती मिळेल. त्या आधारावर ते दुरुस्त करा.

असा करा अर्ज

शेतकऱ्यांना स्वतः ऑनलाईन अर्ज करता यावा म्हणून त्यासाठी ‘फॉर्मर कॉर्नर’ टॅबमध्ये सुविधा दिली गेली आहे. तुम्ही https://pmkisan.gov.in/ वर लॉगिन करून फार्मर टॅबमध्ये क्लिक करा. आता पीएम किसान योजनेत नोंदणीचा पर्याय येईल. येथे क्लिक करून आवश्यक ती माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा.

हेल्पलाईनची मदत घेऊ शकता

अर्ज केल्यानंतरही जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील, तर आपल्या लेखापाल, कानुंगो आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा. तेथून काही झाले नाही तर केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या हेल्पलाइनवर (पीएम-किसान हेल्पलाईन १५५२६१ किंवा १८००११५५२६) वर संपर्क करा. तेथूनही काही झाले नाही तर मंत्रालयाच्या दुसर्‍या क्रमांकावर (०११-२४३००६०६, ०११-२३३८१०९२) वर संपर्क करा.