PM Modi-Amit Shah Election Campaign | पंतप्रधान मोदी 10 एप्रिलला तर 6 एप्रिलला अमित शाह महाराष्ट्रात, विदर्भातून करणार प्रचाराची सुरुवात

नागपूर : PM Modi-Amit Shah Election Campaign | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० एप्रिलला महाराष्ट्रात येत आहेत. १० एप्रिलला सायंकाळी पाच वाजता त्यांची रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती स्थानिक भाजप नेत्यांनी दिली. या सभेच्या निमित्ताने राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात पंतप्रधान मोदी करतील.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला पूर्व विदर्भातील नागपूर, गडचिरोली, भंडारा -गोंदिया, रामटेक व चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या पाच लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेते येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्याचे येथील भाजपा नेत्यांनी सांगितले. दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे जाहीर सभा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी गडमंदिराला भेट देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सहा एप्रिलला गोंदिया येथे जाहीर सभा होणार आहे. भाजपच्या विभागीय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार शहा हे ६ एप्रिलला दुपारी ३ वाजता विमानाने दिल्लीहून नागपूर येथे येणार आहेत. येथून ते हेलिकॉप्टरने गोंदियाला जातील. ४ वाजता जाहीर सभा होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त

विश्रांतवाडी, वानवडी, हडपसर परिसरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह दोन कारची चोरी

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा; अभिनेते रणदीप हुडा यांनी पाळला
पुनीत बालन यांना दिलेला शब्द (Video)