मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती ? मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय, पंतप्रधानांचं आश्वासन

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन –   मुलींच्या विवाहाच योग्य काय असाव, यासंदर्भात सरकार लवकरच निणर्य घेणार आहे. यासंबधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिल आहे. संबधित समितीने निर्णय दिल्यानंतर या संदर्भात निणर्य घेण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.मोदीनी यावेळी महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेविषयी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. प्रत्येक मुलीच्या हिताची आपण काळजी घेत आहोत, जलजीवन मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला पाणी पोहचविण्याच काम सुुरु आहे. तसेच 1 रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध केल जात असल्याचे ते म्हणाले.

मुलीचे लग्न आणि आई होण्याच वय यामधील नेमका संबध जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून 22 सप्टेंबर रोजी टास्क फोर्सची निर्मीती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुलीच्या लग्नाच नेमक वय किती असाव, यासंबधी चर्चा सुरु आहे. देशातील मुुलींनी मला संबधित समितीने अहवाल सादर केला नसल्याबाबत विचारणा केली आहे. मी त्या सर्वांना आश्वासन देतो की, अहवाल आल्यानंतर त्यावर लगेच काम सुरु करणार आहे.