पूरग्रस्तांना वाचवणाऱ्या पोलिसाचा ऑन ड्युटी मृत्यू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सातारा, सांगली शहरात पूरस्थिती उद्भवली. पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलेल्या पोलीस राजाराम वाघमोडे यांना पाण्यात भिजून ताप आल्याने निमोनिया झाला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. पलूस येथे पूरग्रस्तांच्या मदतीला वाघमोडे हे आठवडाभर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे.

पुरामधून वाचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस आणि एनडीआरएफ यांनी मोठे कार्य केले. रात्रंदिवस पाण्यामध्ये असल्यामुळे पुरग्रस्तांप्रमाणे पोलिसांचे हाल झाले. पूरग्रस्तांना मदत करत असताना पोलीस राजाराम वाघमोडे यांना पाण्यात भिजून ताप आल्याने निमोनिया झाला होता. ऑन ड्यूटी असताना त्यांना चक्कर आली. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. राजाराम पांडुरंग वाघमोडे हे गेल्या 25 वर्षांपासून पोलीस सेवेत कार्यरत होते.

कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. पूर ओसरल्यानंतर आता साथीच्या आजारांनाही सुरुवात झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –