पाथरी : विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन –  वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत याचाच एक भाग म्हणून नियमितपणे मास्क वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, सोशल डिस्टन्सचे अनुपालन करणे या व इतर नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. पाथरी येथे 13 जुलै रोजी महसूल, नगरपालिका व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवून काल आणि आज अंदाजे 81 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती नगरपरिषद कर्मचारी दिवाण यांनी दिली प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे सोळा हजार दोनशे रुपये दंड वसूल केला. सोमवारी 13 जुलै रोजी करण्यात आलेल्या कारवाई वेळी तहसीलदार बीएस कट्टे, प्रभारी पोलीस निरीक्षक बालाजी तीप्पलवाड, न.प. मुख्‍याधिकारी कारभारी दिवेकर उपस्थित होते एका दुचाकीवर दोघे आढळून येणाऱ्यावर, विना मास्क फिरणार्‍या विरुद्ध प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल केला. 13 14 जुलै रोजी करण्यात आलेल्या कारवाईने मोठा दंड वसूल केला या दंडात्मक कारवाईच्या बडग्‍याने नियम मोडणाऱ्यांना चांगलाच चाप बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात वाढता करोना प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांच्या कडून उपाय योजना केली जात आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

सुजान नागरिकांमधून महसूल, पोलिस प्रशासन, नगरपालिका कर्मचारी यांचे स्वागत व कौतुक केले जात आहे.