पोलीसनामाचा दणका ! ‘सत्कार’ अंगलट आला, जि.प. सदस्या रेखा बांदल यांच्यासह 40 जणांवर FIR

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईन – शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडल्यानंतर गावातील पुढाऱ्यांना सत्काराचा मोह आवरला नाही आणि ग्रामस्थांनी गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरांमध्ये गर्दी करत तब्बल चाळीस हून अधिक लोकांनी एकत्र येऊन नवनिर्वाचित उपसरपंच गिलबिले यांचा सत्कार केला यावेळी गावातील पुढारी व ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली केली, याबाबत फोटो सोशल मिडियावर प्रसारित झाल्यानंतर “पोलिसनामा “ने प्रकाशित केले .आणि अखेरीस या वृत्ताची दखल घेत शिक्रापूर पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्या, सरपंच, उपसरपंच यांसह याब्बळ चाळीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये नावापुढे पद लावण्यासाठी काही दिवसांसाठी उपसरपंच पद मिळून घेण्यासाठी मोठी रस्सीखेच चाललेली होती, त्यामुळे ग्रामपंचायतच्या चालू पाच वर्षांच्या काळामध्ये अनेकांना सरपंच, उपसरपंच पदाची संधी देण्यात आली तर सतरा ऑगस्ट रोजी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली, यावेळी सत्ताधारी गटाच्या रोहिणी दत्तात्रय गिलबिले यांची उपसरपंच पदी निवड झाली निवड झाल्यानंतर अनेकांनी ग्रामपंचायत परिसरात गर्दी करत गिलबिले यांचा सन्मान केला, त्यानंतर शिक्रापूर गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये देखील सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील अनेक पदाधिकारी, पुढारी यांसह अनेकांनी तेथे गर्दी करतात शासनाचे घालून दिलेले सर्व नियम पायदळी तुडवून तोंडावर मास्क न वापरता तसेच सामाजिक अंतर न बाळगता, पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असताना देखील चाळीस पन्नास लोकांची गर्दी करून नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी गिलबिले यांचा सत्कार केला.

याबाबतचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारित झाल्यानंतर “पोलिसनामा” ने या बाबत वृत्त प्रकाशित केले आणि या वृत्ताची दखाल घेत शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मोहिम हाती घेतली आणि याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक तेजस लक्ष्मण रासकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने अखेर शिक्रापूर पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, शिक्रापूर ग्रामपंचायती च्या सरपंच हेमलता राऊत, नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी गिलबिले, माजी आदर्श सरपंच रामभाऊ सासवडे, माजी सरपंच जयश्री भुजबळ, माजी उपसरपंच जयश्री दोरगे, भगवान वाबळे, दत्तात्रय गिलबिले, राजाभाऊ मांढरे, दत्तात्रय राऊत, जनार्दन दोरगे, दिलीप वाबळे, अण्णा हजारे, नाना गिलबिले, आकाश गिलबिले तब्बल चाळीस जणांवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहे.