खुशखबर ! तुमच्यासाठी खुप फायद्याची ‘ही’ सरकारी योजना, दरमहा मिळेल 10 हजार रूपया पर्यंत पेन्शन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या पंतप्रधान वय वंदन योजनेमध्ये मोठे बदल केले आहेत. यामध्ये आता सरकारने गुंतवणूक रकमेची मर्यादा दुप्पट केली आहे. त्याचबरोबर या योजनेचा कालावधी देखील वाढवला आहे. त्यामुळे आता या योजनेंतर्गत तुम्हाला महिन्याला 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार आहे.

काय आहे पंतप्रधान वय वंदन योजना
ही 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 10 वर्षांपर्यंत 8% परताव्याची हमी मिळेल. त्यामुळे या योजनेत सहभाग घेणाऱ्या नागरिकांना या योजनेत पैसे भरण्यासाठी सरकारने पर्याय दिले आहेत. नागरिक यामध्ये मासिक, त्रैमासिक तसेच सहामाही आणि एक वर्षाचे पूर्ण पैसे देखील भरू शकता. 60 वर्ष वयापुढील नागरिक या योजनेत सहभाग घेऊ शकतील.

इतक्या दिवस गुंतवा पैसे
पंतप्रधान वय वंदन योजनेत तुम्हाला 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करायची आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही यामध्ये पैसे गुंतवू शकता. 31 मार्च 2020 हि या योजनेत पैसे गुंतवण्याची शेवटची तारीख आहे.

इतकी करा गुंतवणूक
या योजनेत तुम्ही कमीत कमी 1,44,578 रुपये तर जास्तीत जास्त 14,45,783 रुपये गुंतवू शकता. यामुळे तुम्हाला मासिक 12 हजार रुपये तर वर्षाला एक लाख वीस हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांसाठी हि एक उत्तम योजना असून बँकांपेक्षा हि योजना फार फायदेशीर आहे.

10 हजार रुपयांपर्यंत मिळणार पेन्शन
गुंतवणुकीची रक्कम वाढवल्याने जेष्ठ नागरिकांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. आता सरकारने गुंतवणूकीची रक्कम 15 लाख रुपये केली असून पूर्वी ती साडेसात लाख रुपये होती. त्यामुळे आता जास्त पेन्शन मिळणार आहे. तसेच योजनेची मुदत देखील वाढवण्यात आली आहे.