प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ शब्द

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन –   वंचित बहुजन आघाडीचे c यांच्या नेतृत्वाखाली पुंढपुरात विठ्ठल रुख्मिणी मंदिारासह राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी सोमवारी आंदोलन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर केला आहे. राज्यात धार्मिक स्थळं लवकरच सुरू करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्याबद्ददल त्यांचे आभारही आंबेडकरांनी मानले.

आंदोलनस्थळी यावेळी प्रकाश आंबेडकर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं.

‘मंदिरात प्रवेश करण्यावर आम्ही ठाम’

कारवाई करा, नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलो आहे असं सांगत मंदिर प्रवेश करण्यावर ठाम असल्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या या आंदोलनाला अनेक वारकरी संघटनांचा पाठिंबा आहे. परंतु आंदोलनात सहभागी वारकऱ्यांची संख्या मात्र अत्यल्प होती.

काय म्हणाले संजय राऊत ?

संजत राऊत म्हणाले, “राज्यातील मंदिर बंद ठेवणं ही काही कोणी आंदोलनं करत नाही आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी सुरू करत आहे. लवकरच मंदिरं, रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. विरोधी पक्षानं राज्याच्या हितासाठी संयम बाळगला तर जनतेवर उपाकर होतील” अशी टीका राऊतांनी केली आहे.