सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे पिछाडीवर !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे काँग्रेसकडून सोलापूर शहर मध्ये मतदारसंघातून निवडणुकीसाठी मैदानात आहेत. प्रणिती यांच्या विरोधात शिवसेनेने दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय महेश कोठे हे अपक्ष उभे आहेत तर एमआयएमचे फारूख शाब्दी हे मैदानात आहे. दरम्यान शिवसेनेचे दिलीप माने आणि अपक्ष महेश कोठे यांनी प्रणिती शिंदे यांना जोरदार लढत दिल्याचे दिसत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, प्रणिती शिंदे या पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.

पूर्वी याच मतदारसंघातून प्रणिती शिंदे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे लोकसभेत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. याशिवाय राज्यात काँग्रेसविरोधी वातावरण असल्याने ही लढाई प्रणिती शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात होती. इतकेच नाही तर दिलीप माने हेदेखील काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत. तरीही अंतिम निकाल काय येणार आहे याकडे सोलापूरासह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पहिल्या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली होती. त्यांना 2400 मतं मिळाली होती. एमआयमएमच्या फारूख शाब्दी यांना 1800 तर दिलीप माने 1600 आणि महेश कोठेंना 1500 मत मिळाली होती. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एकूण 15पेक्षाही अधिक उमेदवार आहेत. पहिल्या फेरीअखेर आघाडी घेणाऱ्या प्रणिती शिंदे मात्र पिछाडीवर गेल्या आहेत.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत.

Visit : Policenama.com