PM नरेंद्र मोदींनी पीएम केअर फंडाला कशी दिली मदत ? प्रशांत भूषणचा हटके व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत एकत्रित करण्यासाठी पीएम केअर फंडाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वातआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडाला मदत दिली आहे. याबाबत त्यांनी ही मदत कशी केली हे सांगणारा व्हिडीओ प्रशांत भूषण यांनी पोस्ट केला आहे. पीएम केअर या फंडावर सुरुवातीपासूनच विरोधकांनी टीका केली आहे.

व्हिडीओत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्या फोटोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडाला 2.25 लाख रुपये दिल्याचे म्हटले आहे. या फोटोच्याच बाजूला मिस्टर बिन या विनोदी पात्राचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत मिस्टर बिन हे स्वतःसाठीच काही मोकळी पाकिटे चिटकवतो. दाराबाहेर जातो आणि लेटर बॉक्सची जागा असते तिथून स्वतःलाच पोस्ट करतो. एक-दोन-तीन अशी स्वतःच चिटकवलेली आणि स्वतःला पाठवलेली पत्रे पाहून आनंदी होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअरला केलेली मदत ही अगदी अशाच प्रकारे आहे असे प्रशांत भूषण यांनी हटके व्हिडीओद्वारे सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली मदत ही कशाप्रकारे आहे याची खिल्ली उडवणार्‍या या व्हिडीओच्या खाली विविध नेटकर्‍यांनी संमिश्र प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत