गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा ! अननसात नव्हे तर नाराळात भरले होते फटाके

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गर्भवती हत्तीणीला मारण्यासाठी अननस नव्हे तर नारळामध्ये फटाके भरल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे हत्तीणीचा दुर्देवी मृत्यू झाला. मन्नारकाडचे वन्यजीव संरक्षण अधिकारी सुनील कुमार या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची चौकशी करत आहेत. त्यातून हा खुलासा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वन विभागाचे अधिकार्‍यांनी आरोपी विल्सनला घटनास्थळी नेले होते. त्यावेळी जिथे त्यांनी नारळामध्ये फटाके भरण्यात आले तेथे तपास करण्यात आला. आतापर्यंतच्या आणखी दोघांनी आरोपीची मदत केल्यानंतर फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी हा रबरच्या शेतीमध्ये काम करतो. शेताचे रक्षण करण्यासाठी फळांमध्ये फटाके भरून ठेवतात, त्याने जंगली जनावरांना घाबरवण्यास मदत होते.

मात्रा, हत्तीणीने फटाक्यांनी भरलेले नारळ स्वत: खाल्ले की तिला ते खाण्यासाठी देण्यात आले याचा शोध घेतला जात आहे. पण नाराळलाती फटाके खाल्ल्यामुळे हित्तीणीच्या चेहर्‍याला प्रचंड जखमा झाल्या होत्या. वेदनांनी ग्रासलेल्या हत्तीणीला काहीच कळले नाही, तेव्हा ती वेलीयार नदीत उभी राहिली. वेदना कमी करण्यासाठी संपूर्ण वेळ फक्त पाणीच पित होती. पण अखेर या वेदनांनी तिचा मृत्यू झाला. ही हत्तीणी अन्नाच्या शोधात भटकत होती, 25 मे रोजी जवळच्या गावात आल्यानंतर तिला मुलांनी खायला दिलं.