प्रियंका चोपडचा ब्लेजर सूटमध्ये दिसला स्टनिंग लुक , रेड कार्पेटवर दिल्या ‘अशा’ पोज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री प्रियंका चोपडा आपल्या लुक आणि स्टाईलने नेहमीच चाहत्यांना इम्प्रेस करत असते. ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही लुकमध्ये देसी गर्ल कमालीची सुंदर दिसते. नुकतीच प्रियंका एनबीए इंडिया गेम्सच्या पार्टीला आली होती. यावेळी सर्वांना तिचा बोल्ड लुक पाहायला मिळाला. इथेही प्रियंका फॅशन गोल देताना दिसली.
   

इव्हेंटमध्ये प्रियंकाने पिंक ब्लेजर सूट घातला होता. यात प्रियंका खूपच हॉट दिसत होती. तिचं क्लीव्हेज स्पष्ट दिसत होतं. प्रियंका आपल्या फॅशनसोबत नेहमीच काही ना काही एक्सपेरिमेंट करत असते.

यावेळी प्रियंकाने मिनिमल मेकअप केला होता आणि पिंक कलरची लिपस्टिक लावली होती. मॅसी बनने तिच्या लुकला चार चांद लागले होते. तिने ड्रेसवर मॅच होतील असे पिंक हिल्सही घातले होते. सध्या प्रियंकाचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. चाहत्यांना प्रियंकाचा हा हॉट लुक खूप भावला आहे.

 

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती शोनाली बोस दिग्दर्शित सिनेमा द स्काय इज पिंकमध्ये दिसणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. याशिवाय प्रियंका द व्हाईट टायगर या नेटफ्लिक्सच्या वेब सीरीज मध्ये दिसणार आहे.