परभणीत मोदी सरकारच्या कांद्याच्या धोरणाविरोधात निषेध

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या विरोधात आज कॉंग्रेसतर्फे परभणीमध्ये आंदोलन करण्यात आले.

कांदा उत्पादक शेतकरी आधीच अडचणीत सापडले असताना, केंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यात बंदी लादल्याने कांद्याचे दर कमी झाले आणि शेतकरी हैराण झाले आहेत.

त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी त्वरित हटवावी या मागणीसाठी कॉंग्रेसने परभणी शहरातील शिवाजी पुतळ्या समोर आंदोलन केले.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत आणि सरकारने घेतलेला हा निर्णय त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र कॉंग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

माजी राज्यमंत्री तथा आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वात परभणी जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या कांदा निर्यात बंदी धोरणाचा निषेध करण्यात आला.

आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस तथा शहर काँग्रेस समिती कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग नोंदविला.

कांदा निर्यात बंदी धोरणाविरोधात शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

बुधवार 16 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षातर्फे परभणीत वरपूडकर यांच्या नेतृत्वात परभणी जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.