खळबळजनक ! त्यानं चक्क हातवारे केले अन् महिला पोलिसाला म्हणाला ‘लॉजवर चल जाऊ’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक शहरात महिला पोलिसांंनी मध्यरात्री महिला सुरक्षेसाठी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. शहरात पोलिसांतर्फे मध्यरात्री करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रात्री बारा ते पहाटे पाच पर्यंत शहरातील विविध भागात साध्या वेशातील महिला पोलीस उभ्या करण्यात आल्या आहेत. या दरम्यान टवाळखोर, वासनांध, सडकसख्याहरींची पोलखोल केली गेली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकार –
अंबड पोलिसांनी दिव्या एडलॅब्ज परिसरात केल्यास स्टिंग ऑपरेशनमध्ये हेंमत शिवाजी वाघ (वय 33), गणेश परशुराम वरुडे (वय 31), भरत अभिमन पाटील (वय 33) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी साध्या वेशातील महिला पोलिसांना हातवारे करुन लॉजवर जाऊ असे बोलून अश्लील वर्तन केले, पंचवटी कारंजा आणि रामकुंड परिसरात संशयित आशिष लक्ष्मीचंद अग्रहरी (वय 30) आणि अक्षी अमीर इस्माइल अत्रम (वय 45) यांनी साध्या वेशातील महिला पोलिसांकडे पाहून अश्लील हावभाव केले. या दोघांंच्या विरोधात देखील पंचवटी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अशाच दुसरा प्रकार –
आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्टिंग ऑपरेशनचा आदेश दिला आहे. त्या अंतर्गत शहरातील विविध भागात सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या महिला पोलिसांभोवती साध्या वेशात इतर पोलीस कर्मचारी देखील साध्या वेशात उभे होते. एवढेच नाही तर या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील सुरु आहे. ठक्कर बाझार बस स्थानकाबाेर महिला पोलीस रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या त्यावेळी कमलकुमार गिरधारीलाल खेमाणी या 52 वर्षीय व्यक्तीने महिला पोलिसाजवळ जाऊन एक टक पाहून अश्लील वर्तन केले. महिला पोलिसांचा त्यांने पाठलागा देखील केला. त्यामुळे पोलिसांनी या कमलकुमार नावाच्या इसमाला ताब्यात घेतले आणि त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/