पुण्यातील कोंढव्यात युवकाची ‘विवस्त्र’ धिंड, सोशल मिडीयावर व्हिडिओ ‘व्हायरल’, पोलिसांकडून 5 जणांना ‘अटक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोंढवा परिसरात कार दुरूस्तीस आलेल्या गाड्यांमधील खंडणी स्वरूपात पैसे न दिल्यामुळे आठ जणांच्या टोळक्याने गॅरेज चालकाचे अपहरण करून त्याची विवस्त्र धिंड काढल्याची घटना समोर अली आहे. अपहरणानंतर तरुणाला मारहाण करत सिगारेटचे चटके दिले गेले होते. याप्रकणी पोलिसानी पाच जणांना अटक केली आहे.

सेहर गुलाम गौस शेख (वय ३६, रा,भवानी पेठ), मतीन उर्फ नौशाद शेख (वय २४, रा. चुडामन तालीम, भवानी पेठ), राहील इसरार शेख (वय २५, रा. भवानी पेठ), उबेर अली शेख (वय २४, रा. पर्वती), सिद्दीकी ईद्रीस शेख (वय २८, रा. भवानी पेठ) /यांना अटक केली आहे. तर इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचा गॅरेजचा व्यवसाय आहे. तो मूळचा कर्नाटक येथील आहे. त्यांचे आरोपी सेहर व मतीन हे मित्र आहेत. हे दोघे गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी मेहर हा त्याच्या ओळखीने दुरूस्तीसाठी आलेल्या कारमध्ये कमिशन स्वरूपात तरुणाकडे खंडणी स्वरूपात पैसे मागत होता.

आरोपीने एक जग्वार कंपनीची गाडी दुरुस्तीसाठी पाठविली होती. त्यांने व्यावसायिकास दुरुस्तीच्या खर्चापेक्षा पाच लाख रुपये अधिक घ्यायला सांगितले. मात्र, तक्रारदार यानी अडीच लाख रुपये घेतले. तरीही आरोपी कमिशन पोटी चार लाख ५० हजार रुपये मागत होते. ते पैसे न दिल्याच्या रागातून आरोपीनि दोन दिवसापूर्वी (१६ नोव्हेंबर) रात्री सातच्या सुमारास गॅरेजमधून तरुणाचे अपहरण केले. तसेच हडपसर व खराडी परिसरात नेले. त्या ठिकाणी तक्रारदार यांचे कपडे काढून त्यांना लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण केली. तक्रारदार यांच्या अंगावरील तीन तोळ्याची साखळी, १७ हजार रूपये काढून घेतले. त्यानंतर त्यांची नग्नावस्थेत धिंड काढून अंगावर सिगारेटचे चटके दिले.

त्यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास गॅरेजजवळ सोडले.
तसेच आरोपींनी व्हिडीओ चित्रीकरण केले होते. घटनेनंतर तीन दिवसांनी आरोपींनी त्याचे चित्रीकरण व्हायरल केले. त्यानंतर तक्रारदार यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. या घटनेचे काही ठिकाणी सीसीटीव्हीत देखील चित्रीकरण झाले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक चेतन मोरे हे करत आहेत.

Visit :  Policenama.com