पुण्यात जामिनावर आलेल्या सराईतानं केले मायलेकीवर कोयत्यानी वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामिनावर कारागृहातून बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगारांने कौटुंबिक वादातून शेजारी राहणाऱ्या मायलेकीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. त्यात दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. रामटेकडी परिसरात सोमवारी घडला. या प्रकरणी तिलकसिंग कल्याणी आणि लकीसिंग कल्याणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बबिताकौर कल्याणी (40, रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिलकसिंग हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर घरफोडीच्या गुन्हे दाखल आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो नुकताच अटी व शर्तीवर कारागृहाबाहेर आला आहे. फिर्यादी बबिताकौर कल्याणी आणि आरोपी तिलकसिंग कल्याणी, लकीसिंग कल्याणी हे शेजारी राहण्यास आहेत. त्यांच्यामध्ये पाच वर्षापासून कौटुंबिक वाद आहेत.

याच कौटुंबिक वादाच्या कारणावरून सोमवारी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याच्यात पुन्हा भांडणे झाली. त्यावेळी दोन्ही आरेापींनी फिर्यादींना शिवीगाळ केली. याचाच जाब बबिताकौर यांनी विचारला. जाब विचारल्याच्या कारणावरून तिलकसिंग आणि लकीसिंग यांनी कोयत्याने बतिताकौर यांच्या हाताच्या मनगटावर, पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी बबिता कौर यांची मुलगी आली असता तिच्याही डोळ्यावर आरोपींनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. वानवडी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like