पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात भाजपाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्त टिळक यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत एका बैठकीला मुक्ता टिळक या उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांनीही आपली कोरोना टेस्ट करून घेतली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मात्र टिळक यांना कुठलीही लक्षणे नाहीत. त्यामुळे त्या घरातच क्वारंटाईन झाल्या आहेत. मोहोळ यांच्या संपर्कात जे लोक आले होते, त्या सगळ्यांच्या टेस्ट करण्यात येत आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

महापौरांशी गेल्या चार दिवसात संपर्कात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी स्वता:ला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे तर अनेक नगरसेवकही धास्तावले आहेत. यापूर्वी महापालिकेचे सहा नगरसेवक कोरोनाने बाधित झाले तर आतापर्य़ंत जवळपास 200 पक्षा अधिक कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित आहेत. महापौर बाधित झाल्यानंतर आता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि शंतनू गोयल हे दखील होम क्वारंटाइन आहेत.

यापूर्वी उपमहापौर सरस्वती शेडगे यांचे पती बाधित झाले होते. मात्र, उपमहापौर बाधित नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाकडून करण्यात आला होता. महापौरांच्या दालनातील 30 कर्मचाऱ्यांच्या सुद्धा चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 15 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत तर बाकीचे रिपोर्ट अजून प्रतीक्षेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like