Coronavirus : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1145 जणांची कोरोनावर मात, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासन देखील प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 1145 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात कोरोनाचे 1073 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर कोरोनामुळं पुणे शहरातील 27 जणांचा आज मृत्यू झाला आहे. पुणे शहरातच मात्र पुण्याबाहेरील 8 रूग्ण देखील आज दगावले आहेत. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 1710 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 72576 वर जावून पोहचला आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 56245 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 14621 रूग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी 760 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 466 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.