Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चा हादरा ! गेल्या 24 तासात शहरात 800 हून जास्त ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, जाणून घ्या आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं संपुर्ण देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिल्ली, मुंबईसह देशातील काही ठिकाणी कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 18 जणांचा बळी गेला असून तब्बल 819 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनामुळं पुण्यात आतापर्यंत तब्बल 703 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 20668 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत शहरात 7276 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 12689 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या 819 पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ससून, नायडू आणि इतर खासगी रूग्णालयातील रूग्णांचा समावेश आहे.

अ‍ॅक्टीव्ह असलेल्या 7276 रूग्णांपैकी 385 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यापैकी 56 रूग्ण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत. पुणे शहरात शहरात गेल्या काही दिवसापासून 500 हून जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात आतापर्यंत 703 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. दरम्यान, दिवसभरात 399 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.