Pune Crime | दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने टोळक्याने तरुणाला मारहाण करुन लुबाडले, चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दारू, सिगारेटसाठी पैसे मागितले असताना ते देण्यास नकार दिल्याने टोळक्याने तरुणाला मारहाण (Beating) करुन लुबाडल्याची घटना हिंगणे खुर्द (Hingane Khurd) येथे मध्यरात्री घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) दरोड्याचा (Robbery) गुन्हा (FIR) दाखल करुन चार जणांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

याप्रकरणी सुरज संतोष ढवळे Suraj Santosh Dhawale (वय 18, रा. साईनगर, हिंगणे खुर्द) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम श्रीकृष्ण सदाफुले Shubham Shrikrishna Sadafule (वय 21), अंकित शिवाजी होटगिरी Ankit Shivaji Hotgiri (वय 19), मयुर मोहन शिंदे Mayur Mohan Shinde (वय 23, तिघे रा. हिंगणे खुर्द), साहील परमेश्वर ढगे Sahil Parmeshwar Dhage (वय 21, रा. हिंगणे खुर्द) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. तसेच पुष्कराज आखाडे (Pushkaraj Akhade) व अव्या यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुरुवारी पहाटे एक वाजता घरी जात असताना गणाधिश संकुल येथील रोडवर मयुर शिंदे याने त्यांना अडविले. अव्या याने फिर्यादी यांना ‘काय रे एवढा का रागाने बघतो’,
असे म्हणत हातातील लोखंडी कोयता दाखवत ‘मला दारु सिगारेटला पैसे दे मला दारु प्यायची आहे.
तू पैसे दे, नाही तर तुला आज सोडणार नाही’,
असे म्हणून शिवीगाळ केली. पुष्कराज आखाडे याने ‘तू पैसे दे नाही तर अव्या सोडणार नाही’ असे म्हणून फिर्यादीला खाली पाडले.
इतरांनी लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली. अव्या याने फिर्यादीच्या गळ्याला लोखंडी कोयता लावून त्यांच्या पॅटच्या खिशातील पाकीट व त्यातील 600 रुपये व आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेऊन सर्व जण पळून गेले.
सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले (API Thorbole) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | After refusing to pay for alcohol, the mob beat the youth and robbed him, arresting four of them

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना एकनाथ खडसेंचे उत्तर; म्हणाले…

 

Tata Group च्या ‘या’ स्टॉकमध्ये मिळू शकतो 41% शानदार रिटर्न; दमदार बिझनेस आऊटलुकवर BUY रेटिंग; पहा टार्गेट

 

PM Kisan e-KYC | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसानची e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली; जाणून घ्या