Pune Crime | विनयभंग करणार्‍याची कॉलर पकडल्याने अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न; कोंढव्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | दुकानात खरेदी करणार्‍यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग (Molestation Case) केल्याने तिने त्याची कॉलर पकडली. त्याचा राग मनात धरुन त्याने कारने मोटारसायकलला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) विनयभंग व खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) करुन एकाला अटक केली आहे.

समीर अहमद सय्यद (वय ३८, रा. गुरुवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका ३५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या पतीसह कॅम्पमधील एका इलेक्ट्रीकल्स दुकानात ११ जानेवारी रोजी खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी समीर याने फिर्यादींच्या गालाच्या रंगावरुन त्यांची जात विचारल्याने फिर्यादी यांनी आरोपीची कॉलर धरली. तेव्हा त्याने फिर्यादीच्या कमरेजवळ मिठी मारुन त्यांचा विनयभंग केला. (Pune Crime)

त्यानंतर दुसर्‍या दिवशी १२ जानेवारी रोजी दुपारी फिर्यादी व त्यांचे पती मोटारसायकलवरुन साळवे गार्डन रोडवरुन जात होते. त्यावेळी आरोपीची कॉलर धरल्याचा राग मनात धरुन मोटारीने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्या ते जखमी झाल्यावर त्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून तो तेथून पळून जाऊ लागला. तेव्हा शिवशंभोनगर येथील लोकांनी अडविल्यावर फिर्यादी यांनी तू अशी गाडी का चालवतोय, असे विचारले असता त्याने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. तेव्हा नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Attempt to kill by causing an accident by grabbing the collar of the molester; Incidents in Kondhwa  Molestation Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात