Pune Crime | पुण्यातील भाजप प्रवक्त्याला मारहाण, राष्ट्रवादीच्या 4 जाणांविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भाजपचे (BJP) प्रवक्ते विनायक आंबेकर (Vinayak Ambekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या विरोधात एक पोस्ट टाकली होती. याचा जाब विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी शनिवारी आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून मारहाण (Beating) केली होती. या प्रकरणी (BJP Spokesperson Beaten Case) पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Pune Police) राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम 504,323 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप यांच्यामध्ये दररोज होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली (Pune Crime). त्यामुळे मुद्यावरुन सुरु झालेला वाद आता गुद्यावर आल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) तक्रार नोंदवली आहे.

आंबेकर यांनी फेसबुकवर (Facebook Post) शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या घटनेचा निषेध केला. तसेच आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या चार जणांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Crime | BJP spokesperson beaten in Pune, FIR against 4 NCP workers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी