Pune Crime News | मोठी ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक, वारजे परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कंपनीची मिळालेली मोठी ऑर्डर देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बारामती येथील दोघांवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2022 ते आजपर्य़ंत वारजे येथील कात्रज देहुरोड बायपास हायवेरील आर स्क्वेअर बिल्डींग जवळ घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत प्रसाद चंद्रकांत दिवाकर (वय-50 रा. चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून मेसर्स डी.एस. पवार चे (M/s D.S. Pawar) मालक दामोदर श्रीपती पवार (Damodar Shripati Pawar), गणेश दामोदर पवार (Ganesh Damodar Pawar) (दोघे रा. बालाजी निवास, गुरुकुल हौसिंग सोसायटी, भिगवण रोड, बारामती) यांच्यावर आयपीसी 420, 406, 465, 467, 468, 471, 472, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम व्यवसायाकरिता लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मशिनरी विक्री व दुरुस्ती करण्याचा भागिदारीत व्यवसाय आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून एक मिनी कॉम्पॅक्टर मशीन खरेदी करुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एका कंपनीची मोठी ऑर्डर मिळाल्याचे भासवून कंपनीचे बनावट सही शिक्का असलेली ऑर्डर फिर्य़ादी यांना दाखवली. तसेच ही ऑर्डर फिर्यादी यांना देण्याचे आश्वासन देवून त्याबदल्यात वेळेवेळी आर.टी.जी.एस द्वारे 57 लाख 83 हजार 500 रुपये घेतले.

आरोपींनी ऑर्डर दिली नसल्याने फिर्यादी यांनी दिलेले पैसे मागितले असता आरोपींनी 18 लाख रुपये परत केले.
मात्र, घेतलेल्या एकूण रक्कमेपैकी 39 लाख 83 हजार 500 रुपये परत न करता रकमेचा अपहार केला.
तसेच फिर्यादी यांच्या एस.एस.हेवी इक्विपमेंट प्रा. लि. कंपनीची
आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनामध्ये 9 लाखांचा ऐवज लंपास

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार