Pune Crime News | दारुसाठी पैसे न दिल्याने गुंडाकडून तरूणाच्या खुनाचा प्रयत्न; येरवडयातील घटना

0
460

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या तोंडावर दगडाने ठेचून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा प्रकार समोर आला आ (Attempt To Murder हे. (Pune Crime News)

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerw कामगारनगर, येरवडा ada Police) सचिन रिको लुंकड (वय २०) आणि नंदकुमार संजय पासंगे (वय २०, दोघे रा. कामगारनगर, येरवडा) यांना अटक केली आहे. सचिन किसन गायकवाड असे जखमी झालेल्याचे नाव आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी नितीन किसन गायकवाड (वय ३३, रा. कामगारनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५/२३) दिली आहे. ही घटना येरवड्यातील कामगारनगर चौकात गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन लुंकड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडी व हत्यार बाळगणे असे दोन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. फिर्यादी यांचा भाऊ सचिन हा लघुशंका करण्यासाठी घराबाहेर गेला असताना त्यांच्या वस्तीतील गुंड सचिन लुंकड व पासंगे यांनी त्यास दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनी शिवीगाळ करुन त्याच्या तोंडावर दगडाने ठेचून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले.

फिर्यादी हे भावाला सोडविण्यासाठी गेले असताना लुंकड याने तलवार बाहेर काढून मध्ये आला तर खल्लास करुन टाकेल, अशी धमकी दिली.
इतरांच्या दिशेने तलवार फिरवून दहशत निर्माण केली.
पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक कवितके तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Attempted murder of youth by gangster for not paying for liquor; Incidents in Yerwada

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; मुंढवा येथील खळबळजनक घटना

BMC Commissioner Iqbal Singh Chahal | ठाकरेंचे विश्वासू अधिकारी ईडीच्या रडारवर, BMC आयुक्त चहल यांना 100 कोटींच्या घोटाळाप्रकरणी ईडीची नोटीस

Bombay High Court | मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा, पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

IND vs NZ T20 Series | टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा 15 सदस्यीय संघ जाहीर; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

Nashik MLC Election | भाजप सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार?, देवेंद्र फडणवीसांनी ठेवला सस्पेन्स, म्हणाले-‘वाट पहा…’