Pune Crime News | फळ विक्रेत्याला अडवून कोयत्याने वार, जबरदस्तीने पैसे लुटणारा गजाआड; येरवडा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दुकान बंद करुन घरी जात असताना एका फळ विक्रेत्याला (Fruit Vendor) अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. तसेच पँन्टच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेत परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपीला येरवडा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. हा प्रकार येरवडा परिसरातील पर्णकुटी चौकातील मेट्रो ब्रिजखाली 30 नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत गाजीबक्श बाबुलाल चौधरी (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन प्रज्वल नवीन जडाल (रा. येरवडा, पुणे) याच्यावर आयपीसी 394 सह आर्म अॅक्ट (Arm Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रज्वल जडाल व फिर्यादी चौधरी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचा फळ विक्रीचा व्यवसाय असून, फळ विक्री करून ते रात्री दहाच्या सुमारास घरी जात होते. मेट्रो ब्रिजखाली (Pune Metro Bridge) आरोपीने फिर्यादी यांना अडवले. त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या हातील कोयता हवेत फिरवून ‘कोणी मध्ये आला तर त्याला जिवंत सोडणार नाही, इथेच खल्लास करीन’ असे बोलून परिसरात दहशत निर्माण केली. यानंतर फिर्यादी यांच्या खिशातील 5700 रुपये जबरदस्तीने चोरी करुन आरोपी तिथून निघून गेला. फिर्यादी यांनी तक्रार देताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Sr PI Balkrishna Kadam) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लग्नाचे आमिष दाखवून आत्येभावाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हडपसर परिसरातील घटना

बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यातील बँकेची 21 लाखांची फसवणूक

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड