Pune Crime News | गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तीन गुन्हेगार तडीपार, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 3 अट्टल गुन्हेगारांवर परिमंडळ 2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी तडीपारीची कारवाई (Pune Police Tadipari Action) केली आहे. स्वारगेट (Swargate Police Station) आणि सहकारनगर पोलिस स्टेशनकडून (Sahakar Nagar Police Station) प्राप्त झालेल्या तडीपार प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 3 जणांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय (Pimpri Chinchwad Police) आणि पुणे जिल्हयातून तडीपार (Pune Rural Police) करण्यात आले आहे. (Pune Crime News)

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सागर श्रावण पवार-पाटोळे Sagar Shravan Pawar-Patole (वय-28 रा. राजीव गांधीनगर, अंबिल ओढा, पुणे सध्या रा. डुक्करखिंड, वारजे), प्रथम उर्फ मनोज विनोद ससाणे Pratham Alias Manoj Vinod Sasane (वय-20 रा. भवानी पेठ, पुणे) तसेच सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश अरुण गायकवाड Ganesh Arun Gaikwad (वय-24 रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे) यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार हे पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Records)आहेत. खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder), खंडणी (Extortion Case), गंभीर दुखापत, दहशत माजवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, तोडफोड करणे, शिवीगाळ, मारहाण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा यासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आरोपींच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे पाठवला होता. प्रस्तावाची चौकशी पुर्ण केल्यानंतर 3 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी केली आहे.
आगामी काळात देखील झोन दोन मधील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांवर अशाच प्रकारची प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कारण आलं समोर

पुणे पोलिसांकडून पावणे पाच कोटींचा अमली पदार्थांचा साठा नष्ट

खरेदी केलेली अ‍ॅम्ब्युलन्स नावावर करुन न देता कंपनीची फसवणूक, खेड येथील घटना

ACB Trap Case | शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक 50 हजाराची लाच घेताना
अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune PMC License Inspector Suspended | कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील
3 परवाना निरीक्षक निलंबित, नदीपात्रातील होर्डिंग प्रकरण भोवलं