Pune Crime | शास्त्री रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फर्ग्युसन महाविद्यालय (Ferguson College) परिसरातील ‘हेअर स्पा’ मध्ये तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी पुण्यातील (Pune Crime) सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) स्पर्धा परीक्षेच्या विद्यर्थीनीचा भररस्त्यात विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.10) सकाळी अकराच्या सुमारास शास्त्री रोड (Shastri Road) परिसरात घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याबाबत नवी पेठत राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास (Competitive Exam Study) करते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मैत्रिणीसोबत शास्त्री रस्त्यावरुन टिळक रोडने (Tilak Road) जात होती. त्यावेळी चिंतामणी इमारतीसमोर अचानक एका तरुणाने अश्लील चाळे (Pornography) करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडे पाहून अश्लिल बोलण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत अनोळखी तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. (Pune Crime)

शहरात सलग दुसऱ्या दिवशी तरुणीचा भररस्त्यात विनयभंग केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा (Women Security) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यात महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडत असल्याने तरुणींकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अशा विकृत व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

Web Title : Pune Crime | student molested all day on shastri road in pune vishrambaug police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…

Multibagger Stock | 3 महिन्यात 300% वाढला ‘या’ बासमती तांदळाच्या कंपनीचा स्टॉक, तुम्ही खरेदी केला आहे का?