Pune Crime | येरवडा कारागृहात स्वत:वर गोळी झाडून घेणाऱ्या जेल पोलिसाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | येरवडा कारागृहात (Yerwada Jail) कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आज (रविवार) पहाटे स्वत:वर गोळी झाडून (Shooting Himself) घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt To Suicide) केला होता. अमोल मुरलीधर माने Amol Mane (वय-28) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या माने यांना ससून हॉस्पिटलमध्ये (Sasoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान माने यांचा मृत्यू (Death) झाला आहे. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल माने हे यरवडा कारागृहात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शनिवारी गार्ड ड्यूटी (Guard Duty) होती. पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सरकारी रायफलमधून (Government Rifle) स्वत:वर गोळी झाडून घेतली. हा प्रकरार समजताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. माने यांनी कौटुंबिक कारणावरुन हे कृत्य केल्याचे समजतेय.

 

माने यांनी कपाळाच्या मध्यभागी गोळी झाडून घेतली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु असताना दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अमोल माने हे मुळचे अहमदनगरमधील (Ahmednagar) राहणारे असून ते 2015 मध्ये कारागृह पोलीस (Prison Police) म्हणून भरती झाले होते.

 

Web Title :- Pune Crime | yerwada jail police amol mane firing himself suicide pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा