धनकवडीत शस्त्रधारी टोळक्याचा धुडगूस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धनकवडी परिसरात दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल तरुणांवर धारधार हत्याराने वारकरून तुफान राडा घातल्याची घटना रविवारी रात्री घडली. यात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

याप्रकरणी आदेश बिरमाणे (वय 24, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदेश बिरमाणे व त्याचा मित्र संदिप शेंडकर हे दोघे रंजनी कॉर्नरवर मोबाईलवर गेम खेळत बसले होते. यावेळी दुचाकीवर काही तरूण त्याठिकाणी आले.

काही एक कारण नसताना त्यांनी अचानक फिर्यादीच्या हातावर तसेच मानेवर लोखंडी शस्त्राने व लाकडाने बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तर, फिर्यादीचा मित्र संदिप यालाही बेदम मारहाणकरून परिसरात दहशत माजविली. काही काळ सुरू असणार्‍या या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर टोळके दुचाकीवरून तेथून पसार झाले. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –