पुण्यातील नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात ! 7 वाहने एकमेकांना धडकली (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील नवले ब्रिजजवळ आज एकमेकांना 7 वाहने धडकून विचित्र अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. पण एका ट्रक चालकामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. याप्रकरणी सिहंगड रोड पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

https://www.facebook.com/watch/?v=3170892156305745

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नउच्या सुमारास नवले ब्रीजजवळ असलेला सिग्नल रेड झाला. त्यामुळे चालकांनी वाहने जागीच थांबवली. त्यानंतर पाठीमागून आलेल्या ट्रकचालकाने समोरील वाहनाला धडक दिली. त्यामुळे एकापाठोपाठ असलेल्या 7 वाहनांना धडक बसली. ट्रकचालकाला ब्रेक लागला नसावा किंवा त्याने दुर्लक्ष केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विकास मते यांनी दिली आहे. दरम्यान यामुळे काही काळ परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर सिहंगड पोलीस व वाहतूक पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली.