सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमीजवळील महापालिकेच्या आरोग्य कोठीला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमीजवळील महापालिकेच्या आरोग्य कोठीला भीषण आग लागल्याची घटना घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
हॉटेल पंचमीजवळ महापालिकेची आरोग्य कोठी आहे. त्याठिकाणी ओला आणि सुखा कचरा होता. अचानक 5 वाजण्याच्या सुमारास येथून धूर येत असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलीस व अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केले होते. जवानांनी पाण्याचा माराकरून काही वेळात ही आग आटोक्यात आणली. यात आरोग्य कोठी जळून खाक झाली आहे. या रस्त्यावर कायम रहदारी असते. पण लॉकडाऊन असल्याने गर्दी नव्हती.