Pune : पदवीधर मतदारांनी सामाजिक संदेश देत साजरा केला नीता ढमालेंचा वाढदिवस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे पदवीधर मतदारसंघातुन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या नीता ढमाले यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करत खुद्द पदवीधर मतदारांनीच त्यांचा वाढदिवस साजरा केल्याचे आज पहायला मिळाले. ढमाले या प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांना मानणाऱ्या पदवीधर मतदारांनी सामाजिक संदेश देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करत ढमाले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात नीता ढमाले आणि मंदिराचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते देवीची आरती पार पडली. यावेळी जवळपास तिनशे पदवीधर युवक युवती आणि पदाधिकारी आरतीला उपस्थित होते. कोल्हापूर महापुराच्या वेळी बचावकार्यात प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या मावळा संघटनेच्या उमेश पोवार आणि सहकाऱ्यांनी यावेळी ढमाले यांना राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

२६ नोव्हेंबर हा संविधान दिन असल्याने नीता ढमाले आणि पदवीधर मतदारांनी भाई माधवराव बागल यांनी उभारलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्याच्या स्मारकस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थित असणाऱ्या महिला पदवीधर मतदारांनी नीता ढमाले यांना संविधानाची प्रत भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

‘आज भारतीय संविधानामुळेच माझ्यासारख्या एका महिलेला पुणे पदवीधरची निवडणुक लढवण्याची संधी मिळत आहे. परंतु गेल्या सत्तर वर्षात पुणे पदवीधर मतदारसंघात एकदाही कुठल्या महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत मतदारांनी मला जे प्रेम दाखवले, त्या जोरावर आपण ही निवडणूक नक्कीच जिंकू असा मला विश्वास आहे.’

– नीता ढमाले, अपक्ष उमेदवार, पुणे पदवीधर मतदारसंघ

You might also like