भरधाव वाहनाच्या धडकेत 5 वर्षांचा बिबट्या जागीच ठार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री अडीच्या सुमारास ही घटना घडली आहे. ओतूरचे वनक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी याबाबत माहिती दिली आहे. पिंपरी पेंढार येथील ही घटना आहे.

आज (शुक्रवार दि 20) नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार हद्दीत अज्ञात वाहनानं बिबट्याला धडक दिली. या धडकेत नर बिबट्या जागीच ठार झाला. हा नर बिबट्या 5 वर्षांचा होता.

पिंपळवंडीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मंगेश खिलारी यांनी या बिबट्याचं शवविच्छेदन केलं. त्यांनी सांगितलं की, हा बिबच्या 5 वर्षांचा असून त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता ज्यामुळे त्याचा जागेवर मृत्यू झाला.

वन परिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे वनपाल साळुंखे, वनरक्षक व्ही टी विभुते, वनसेवक बी के खर्गे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/