Pune Loanavala Police | लोणावळ्यातील हॉटेल बैठक ढाबा येथील अवैध हुक्का पार्लरवर छापा, हॉटेल मालकासह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Loanavala Police | अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या लोणावळ्यातील हॉटेल बैठक ढाबा येथे आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी छापा टाकून त्याठिकाणी विक्रीसाठी असलेला हुकक्यासाठी लागणारे पॉट, तंबाखुयुक्त फ्लेवर्स, फिल्टर, पाइप असा एकूण 44 हजार 790 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हॉटेल मालकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Illegal Hookah Parlour raided at Hotel in Lonavala, case registered against three including hotel owner)

पोलीस नाईक सचिन गायकवाड यांनी सरकारतर्फे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन कृष्णा नाथा राठोड (वय 31 रा.लोणावळा कालेकर मळा, दत्त मंदिरासमोर लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे), प्रताप कृष्णा डिंमळे (वय 42 व्यवसाय हाटेल मालक, रा. कार्ला, ता. मावळ, जि.पुणे), बिपीन्छु मार परमेश्वर महतो (वय 30 रा. भारती अपार्टमेंन्ट, फ्लॅट नं.202, साईबाबा मंदीराजवळ शांतीनगर, उल्हासनगर, ठाणे) यांचेविरोधात सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वित्तरण, विनीमय) अधिनियम 2003 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) व 21 (अ) सह भादवि कलम 188, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक (IPS Satya Sai Karthik) यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा विभागातील सर्व आस्थापना चालक यांनी त्यांना नेमून दिलेल्या नियमांचे व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे आव्हान केले होते. तरीही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करताना आढळून आले.

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल बैठक ढाबा या हॉटेलमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालत असल्याची माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्याआधारे शनिवारी (दि.16) मध्यरात्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह हॉटेल बैठक ढाबा, जुना मुंबई पुणे महामार्ग, कार्ला, याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी हॉटेलचालक हे हॉटेलमधेच अवैध हुक्का पार्लर चालवून ग्राहकांना अवैधपणे हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी विक्रीसाठी असलेला हुकक्यासाठी लागणारे पॉट, तंबाखुयुक्त फ्लेवर्स, फिल्टर, पाईप ई. असा एकूण 44 हजार 790 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,(IPS Pankaj Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे
यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक,
पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, पोलीस अंमलदार अंकुश नायकुडे,
सचिन गायकवाड, सुभाष शिंदे, अंकुश पवार, गणेश येळवंडे, काळे, टकले, माळवे, पवार,
महिला पोलीस कॉन्स्टेबल चवरे, शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक, तीन गुन्ह्यातील चार लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Nashik City Police | प्रतिबंधित गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची CAA कायद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका, ”बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा…”

Pune-Baramati-Shirur-Maval Lok Sabha | बारमती मतदारसंघात 7 मे तर पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 13 मे रोजी होणार मतदान

IAS Rajendra Bhosale | सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार – नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले