Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून युवकाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू; तरुणावर खुनाचा गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शिवीगाळ केल्याच्या रागातून एका 40 वर्षीय व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. शवविच्छेदन अहवालानंतर वाकड पोलिसांनी (PCPC Police) एका तरुणाविरुद्ध खुनाचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काळेवाडी फाटा येथे 2 डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडला होता. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

योगेश जगन्नाथ सुर्वे Yogesh Jagannath Surve (वय-40 रा. नखातेनगर, रहाटणी, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई भास्कर किसन भारती (Bhaskar Kisan Bharti) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनिकेत उर्फ सनी रमेश काळे (वय-28 रा. अशोकनगर झोपडपट्टी, वाशी नाका, चेंबुर, मुंबई) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत योगेश सुर्वे याने आरोपी अनिकेत काळे याला शिवीगाळ (Abuse) केली होती.
याचा राग आरोपीच्या मनात होता. 2 डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास आरोपीने योगेश याला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून पोटावर लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने योगेश याला पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी योगेश सुर्वे याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात पोटावर जबर मारहाण करण्यात आल्याने
पोटातील आतड्यांना गंभीर दुखापत झाल्याने योगेश सुर्वे याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
यावरुन वाकड पोलिसांनी आरोपी अनिकेत काळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिवटे (PSI Divate) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Winter Session 2023 | कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीवरील बंदीबाबत अजित पवार सभागृहात म्हणाले, ”गरज पडल्यास…”

Shweta Tiwari Hot Photo | श्वेता तिवारीच्या मादक अदेवर चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो..

किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

Ajit Pawar | नवाब मलिकांसंदर्भातील फडणवीसांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”त्या पत्राचे काय करायचे ते…”

Pune Crime News | जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक, येरवडा परिसरातील प्रकार