Pune Pimpri Chinchwad Crime News | इंन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | इंन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख झालेल्या 32 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन अत्याचार (Pune Rape Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2021 ते डिसेंबर 2023 या कालावधीत कात्रज, गोवा (Goa) येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 32 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन समित उमेश सोनवणे Samit Umesh Sonwane (वय-31) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 417 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, समित आणि पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. चॅटींग करत असताना त्यांचे सूत जुळले. आरोपीने त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत तरुणीला अविवाहित असल्याचे सांगितले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कात्रज येथील एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच गोवा येथे फिरण्यास नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता समित याने
लग्न करण्यास टाळाटाळ करुन अद्यापर्यंत लग्न केले नाही,
असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 77 वी स्थानबध्दतेची कारवाई

”मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली”, पंतप्रधानांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

”घरचे लग्न असल्यासारखे निमंत्रण पत्रिका वाटत सुटलेत”, राम मंदिरावरून संजय राऊतांची जोरदार टीका

एकनाथ खडसे यांचा मोठा दावा, ”महाविकास आघाडीला ३५ ते ४० पेक्षा जास्त जागा मिळतील”

मविआच्या जागावाटपाबाबत अशोक चव्हाण स्पष्टच म्हणाले, बाकीच्या पक्षांशी अद्याप बोलणी नाही, फार्म्युला…

पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे, शासन आदेश जारी

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती

बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या दोघांना अटक, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई

थर्टी फस्टची पार्टी जीवावर बेतली, मावळ तालुक्यात नदीत बुडून तरुणाचा मृत्यू