पुणे : कारवाई जप्त केलेली 173 वाहने परत घेवून जाण्याचं आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –    पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेले 173 वाहने घेऊन जाण्याचे आवाहन केले असून, चार दिवसात त्या-त्या वाहन चालकांनी ओळख पटवून घेऊन जायचे आहेत. चार दिवसांनंतर या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

शहरात वाहतूक विभाग वाहन चालकांवर जोरदार कारवाई करते. लाखो रुपयांचा दंड वसूल केला जातो. तरीही काही जण बेशिस्तपणे वाहन चालवित इतरना धोका निर्माण करतात. आश्यावर पोलिस कारवाई करते. तर वाहने देखील जप्त करण्यात येतात. त्यांच्यावर खटला दाखल केला जातो. त्यानंतर ही वाहने न्यायालयात दंड भरून सोडवून घ्यावी लागतात. तर वाहतूक विभागात देखील दंड केल्यानंतर वाहने दिली जातात. मात्र, अजूनही येरवडा वाहतूक विभागाकडे १७३ वाहने जमा आहेत. मागील अनेक दिवसांपासून संबंधित वाहन मालकांनी दंड जमा केला नाही. त्यामुळे वाहने तशाच अवस्थेत पडून आहेत.

त्यापाश्र्वभूमीवर वाहतूक विभागाकडे जमा असलेली वाहने चार दिवसांच्या आतमध्ये नेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा वाहनांना बेवारस ठरवून लिलाव केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नागरिकांनी ओळख पटवून वाहने ताब्यात घ्यावीत असे आवाहनही केले आहे.