पुण्याच्या SP कॉलेजमधील ‘ते’ फ्लेक्स पोलिसांनी उतरवले

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – टिळक रस्त्यावरील एस.पी. कॉलेजमध्ये अक्षेपाहार्य फ्लेक्स लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ हा फ्लेक्स काढून टाकला. फ्लेक्स कोणी लावला याचा शोधे घेतला जात आहे.

टिळक रस्त्यावरील एस.पी. चौकातील कॉलेजच्या आतील बाजूने हे होर्डिंग लावण्यात आले होते. चौकाच्या कोपर्‍यावरच फ्लेक्स लावल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.

त्याच्यावर अक्षेपाहार्य मजकूर लिहला असल्याचे आढळून आले. ही गोष्ट विश्रामबाग पोलिस व वरिष्ठ अधिकार्‍यांना तत्काळ नागरिकांनी कळविली. त्यानंतर हा फ्लेक्स काढून टाकण्यात आला. या ठिकाणी हा फ्लेक्स कोणी लावला याची चौकशी केली जात आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे झोन एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी सांगितले.