दुचाकीस्वार महाविद्याालयीन तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव दुचाकीस्वार महाविद्याालयीन तरुणाने वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. ही घटना कात्रज -देहूरोड बाह्यवळण मार्गावरील आंबेगाव परिसरात घडली.

प्रणव अतुल गलगले (वय २१, सध्या रा. किवळे फाटा, मूळ रा. विर्लेपार्ले, मुंबई) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव एका खासगी अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत होता. तो किवळे फाटा परिसरातील एका सोसायटीत भाडेतत्वावर सदनिका घेऊन राहायला होता.चार दिवसांपूर्वी दुपारी चारच्या सुमारास तो कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरुन घरी निघाला होता. त्यावेळी आंबेगाव परिसरातील डिमार्टसमोर दुचाकीस्वार प्रणवचे नियंत्रण सुटले आणि तो पाठीमागून वाहनांवर आदळला. या घटनेत तो गंभीार जखमी झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. सहाय्यक पोलीस फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.