पवार आपल्या नातवासाठीच राजकारण करतात : राधाकृष्ण विखे-पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनडॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरील दबाव वाढत आहे . मुलाच्या भाजप प्रवेशानंतर वडिल राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसला राजीनामा देणार असं म्हटलं जात आहे. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या दोन ते तीन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जाहीर केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतोपण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा ? अशी प्रतिक्रिया दिली होती . त्यावर विखे पाटलांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तसंच शरद पवार यांच्यावरची नाराजीही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे . शरद पवार आपल्या नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी राजकारण करतात, अशी टीका विखेंनी यावेळी केली आहे.

शरद पवारांनी माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. पवार आपल्या नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी राजकारण करत आहेत असं विखे यांनी म्हटलं आहे.  शिवाय माझ्या राजीनाम्याची घाई मीडियाला झालीय मीडियाला मी काँग्रेसमध्ये नकोय का ?, असा सवालही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

तसंच सुजय विखेंबाबत बोलताना, सध्या सुजय घराघरात पोहोचला आहे. त्याच्यानंतर मग मी आहे…!असं सुचक वक्तव्यही विखे पाटील यांनी केले आहे.

दरम्यान , एक व्यक्ती अमूकच जागेसाठी अडून राहतो . तो हट्ट पुरविण्याची जबाबदारी इतरांची नाही. त्यांच्या वडिलांनी त्यांचा हट्ट पुरविला. त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा दिली. डॉ. सुजय विखे पाटील हे राज्यातील प्रॉमिसिंग लिडर होते का असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

Loading...
You might also like