राधाकृष्ण विखे-पाटील सातव्यांदा विजयी

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सलग सातव्यांदा विजय मिळविला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांचा विखे यांनी पराभव केला. राधाकृष्ण विखे यांना 96 हजार 995 मते मिळाली तर सुरेश थोरात यांना 28 हजार मते मिळाली. 1 लाख 69 हजार एवढे मतदान झाले आहे. विखे 69 हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले.

गेल्या लोकसभेला मुलाला तिकीट नाकारल्यामुळे काँग्रेसचे विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात होते तेही भाजपकडून. यावेळी विखेंना शह देण्यासाठी स्वतः काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी रणनीती आखत स्वतःचे चुलत बंधू सुरेश थोरात यांना शिर्डी मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे इथं विखे विरुद्ध थोरात अशी चुरशीची लढाई होणार हे निश्चित होतं.

कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी विखेंनी प्रयत्न सुरू केले. विखेंनी स्वतःचा विजय खेचून आणला मात्र जिल्ह्यात युतीच्या उमेदवारांना यश येताना दिसत नाही.

Visit : Policenama.com