‘राफेल’ प्रकरणी मोदी सरकारला मोठा ‘दिलासा’, सुप्रीम कोर्टानं ‘पुनर्विचार’ याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने केलेल्या राफेल खरेदी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज महत्वाचा निकाल दिला आहे. या खरेदीप्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या असून याची चौकशी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर चौकीदार चोर आहे या राहुल यांच्या घोषणेविषयी त्यांनी मागितलेली माफी देखील कोर्टाने मान्य केली असून त्यांना कोर्टाने याप्रकरणी दिलासा दिला आहे.

केंद्र सरकारने खरेदी केलेल्या राफेल लढाऊ विमानांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. त्याचबरोबर एका विशिष्ट कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी याचे कंत्राट देखील रिलायन्स कंपनीला देण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. तसेच याप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका देखील दाखल केली होती. या खरेदी व्यवहारामध्ये कोणताही अनियमितपणा झाला नसल्याचे म्हणत कोर्टाने या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या याचिकेमध्ये विमानांच्या किमतींवर देखील आक्षेप घेण्यात आला होता.

दरम्यान, राफेल व्यवहाराबरोबरच आज सुप्रीम कोर्टात शबरीमाला मंदिराची देखील सुनावणी होणार असून राफेलच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष शबरीमाला मंदिराच्या निकालावर लागले आहे.

Visit : Policenama.com