चिंचवडमध्ये 7500 मतांनी राहुल कलाटे आघाडीवर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – चिंचवडमधून अपक्ष उमेदवार राहुल कलाटे 7500 मतांनी आघाडीवर आहेत अशी माहिती समोर आली आहे. भाजपचे लक्ष्मण जगताप हे पिछाडीवर असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. सलग दोन वेळा विजय मिळवलेल्या लक्ष्मण जगताप यांच्यासाठी हि प्रतिष्ठेची निवडणूक असून राहुल कलाटे यांनी विजयासाठी जोर लावला आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने आपला उमेदवार न देता अपक्ष राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्षांनी कलाटे यांच्या विजयासाठी जोर लावला होता. पहिल्या तीन फेऱ्यांमधील मतमोजणीनंतर हि आकडेवारी असून पुढील फेऱ्यांमध्ये काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like