महाराष्ट्रातील रेल्वे योजनांच्या कामांना ‘स्पीड’, मोदी सरकार आल्यानंतर ‘बजेट’मध्ये तब्बल 345 % ची वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील रेल्वे योजनांच्या बजेटमध्ये 345 टक्केंची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या समारे 6722 किलोमीटर लांबीच्या 39 रेल्वे योजनांवर काम केले जात आहे.

जवळपास 87000 कोटी रूपये खर्चाच्या या योजनांमध्ये 16 नवीन लाईन योजना, 5 गेज रूपांतरण तसेच 18 लाईनचे दुपदरीकरण, या कामांचा सहभाग आहे. यामध्ये 2 अशा योजना आहेत, ज्या मागील 25 वर्षापासून पूर्ण होण्याची प्रतिक्षा करत आहेत.

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यानुसार, 2009 पासून 2014 च्या दरम्यान महाराष्ट्राच्या रेल्वे योजनांसाठी वार्षिक बजेटमधून 1171 कोटी रूपये देण्यात आले, परंतु 2014-19 च्या दरम्यान प्रतिवर्ष 5,214 कोटी रूपये करण्यात आले आहे. 2020-21 मध्ये बजेट वाटपात 40 टक्केची वाढ करून 6,700 कोटी रूपये करण्यात आले आहे.

कोणत्या योजनेचे किती झाले काम

लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2017 किलोमीटर लांबीच्या 16 नव्या लाईनची योजनांचे काम सुरू आहे. यामध्ये 62 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.

42,003 कोटी रूपये खर्चाच्या या योजनांवर मार्च 2020 पर्यंत 4141 कोटी रूपये खर्च केले गेले आहेत. याशिवाय 1,146 किलोमीटरच्या 5 योजनांमध्ये 1146 किलोमीटर लांबीमध्ये गेज परिवर्तनचे काम केले जात आहे. यापैकी 589 किलोमीटरवर काम पूर्ण केले आहे. 11,080 कोटी रूपयांच्या खर्चाच्या या योजनांवर मार्च 2020 पर्यंत 5048 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

मंत्र्यांनी सांगितले की, राज्यात 18 रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. ज्यापैकी 375 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मार्च 2020 पर्यंत 33,613 कोटी रूपयांच्या एकुण खर्चापैकी या योजनांवर 8,652 कोटी रूपये खर्च केले गेले आहेत.

या योजनांमध्ये अहमदनगर-बीड-पाली-वैजनाथच्या दरम्यान 261.25 किलोमीटरची नवी लाईन तसेच बालाघाट-कंटगी सदहत जबलपुर-गोंदियामध्ये 300 किलोमीटर गेज परिवर्तनाच्या काम 25 वर्ष अगोदर 1996-97 मध्ये मंजूर केले होते.

महाराष्ट्रात चालू असलेल्या योजना

योजना लांबी मंजूरी वर्ष
अहमदनगर-बीड-पाली-वैजनाथ 261.25 किमी 1995-96
बारामती-लोणंद 63.65 किमी 1998-99
वर्धा-नांदेड वाया यवतमाळ-पुसद 284 किमी 2008-09
बालाघाट-कंटगी सदहत जबलपुर-गोंदीया 300 किमी 1996-97
छिंदवाडा-नागपुर 150 किमी 2005-06
रतलाम-महौ-खंडवा-अकोला आणि फतेहाबाद-चंद्रावती गंज-उज्जैनचा एमएम 495.56 किमी 2008-09
दौंड-गुलबर्गा दुपदरीकरण 225 किमी 2009-10
पुणे-गुंतकल विद्युतीकरण 641.37 किमी 2009-10
गोधनी-कालमना कॉर्ड 13.7 2010-11