Railway Recruitment 2020 : रेल्वेत 10 वी पास उमेदवारांची बंपर भरती, मेरिट लिस्टनं होणार निवड, तात्काळ करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणार्‍या तरूणांसाठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी आहे. Northeast Frontier Railway मध्ये सुमारे 4500 पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया जारी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल (आरआरसी) अंतर्गत या पदावर नोकरीसाठी इच्छूक उमेदवार शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 रात्री 10 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. जाणून घेवूयात अर्ज करण्यासंबंधी सविस्तर माहिती…

शैक्षणिक पात्रता

Northeast Frontier Railway मध्ये अप्रेंटिसच्या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त संस्था किंवा बोर्डातून 10वीची परीक्षा किमान 50% गुणांसह पास असणे अनिवार्य आहे. सोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सुद्धा असणे आवश्यक आहे.

पदांची संख्या

एकुण 4499 पदांवर होणार भरती

वयोमर्यादा

या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 15 वर्ष आणि कमाल वय 24 वर्षापर्यंत निर्धारित करण्यात आले आहे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेची नियमानुसार सूट दिली जाईल.

अर्जाचे शुल्क

या पदांवर अर्ज करण्यासाठी एससी/एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही. तर, अन्य सर्व वर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील.

कशी होईल निवड?

भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही. उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्टद्वारे होईल. भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
https://nfr.indianrailways.gov.in/cris//uploads/files/1597317634676-Act%20App%20Notification%20Final.pdf