रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी ! पदांची संख्या वाढवली, परीक्षा न घेता होणार भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना सुवर्ण संधी चालून आली आहे. कोणतीही परीक्षा न देता थेट रेल्वेमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने 4499 पदांवर भरती काढली होती. मात्र आता रेल्वेने पदांची संख्या वाढवली आहे. रेल्वेने आणखी 432 जागा वाढवल्या असून विभागही बदलेला आहे.

या जागांवर होणार भरती

स्टोनोग्राफर, फिटर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, आरएसी मॅकेनिक, वेल्डर, प्लंबर, प्रिंटर, कारपेंटर, टर्नर आशा विविध ट्रेडसाठी भरती होणार आहे. एकूण जागा 4931 असून या जागांवर भरती करण्यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही. या पदांसाठी 10 पास ते आयटीआय उमेदवार अर्ज करु शकतात. ही भरती एनएफआर डिव्हिजनमध्ये करण्यात येणार आहे.

नोटिफिकेशन जारी

या भरतीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेलद्वारे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार 16 ऑगस्ट पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तर साऊथ ईस्ट सेट्रल रेल्वेच्या विलासपूर भागात 432 पदांवर भरती काढण्यात आली आहे. यासाठी 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

https://nfr.indianrailways.gov.in/cris/uploads/files/1597317634676-Act%20App%20Notification%20Final.pdf

अर्ज कसा करावा

योग्य आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. एनएफआर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. https://nfr.indianrailways.gov.in/index.jsp?lang=0 महत्त्वाचे म्हणजे या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवाराची निवड दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 15 ऑगस्ट 2020
अंतिम तारीख – 15 सप्टेंबर 2020

शिक्षण

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. कमीतकमी 50 टक्के गुण असणे आवश्यक. तसेच आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असणे गरजेचे.

वयाची अट

RRC Recruitment 2020 साठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे असावे. आरक्षणासाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे. 1 जानेवारी 2020 नुसार वय पाहिले जाईल.

शुल्क

एससी/एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तर अन्य वर्गासाठी 100 रुपये शुल्क आहे.