भाजपच्या जाहीरनाम्याबाबत सुपरस्टार रजनीकांत यांची ‘ही’ पहिली प्रतिक्रिया 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपने सोमवारी आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर विरोधी पक्ष काँग्रेसने या जाहीरनाम्यावर टीका करण्यास सुरवात केली आहे. एवढेच नाही तर यावरून प्रो मोदी आणि अँटी मोदी असे ट्विटर वॉर चालू झाले आहे. अशातच सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील भाजपच्या जाहीरनाम्याबाबत वक्तव्य केले आहे. याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

भाजपच्या जाहीरनाम्याबाबत रजनीकांत यांनी म्हंटले आहे की, “अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा मी नद्या एकमेकांना जोडण्याच्या प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यांनी त्यावेळी माझा विचार स्वीकारला होता आणि आता २०१९ साली भाजपच्या जाहीरनाम्यात भाजपने नद्या जोडण्याचे प्रकल्प सुरु करण्याचे वाचन दिले आहे. असे झाल्यास लोक आंनदी होतील” असे अभिनेते रजनीकांत यांनी म्हंटले आहे. एकूणच काय भाजपने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर रजनीकांत यांनी समाधान व्यक्त केले आहे.

रजनीकांत यांचा नवा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सुपरस्टार रजनीकांत यांचा प्रत्येक चित्रपटातील लूक वेगळा असतो. त्यांचा अंदाज नेहमी प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. त्यांचे  नवनवीन चित्रपट पाहण्यास त्यांचे चाहते नेहमी उत्सुक असतात. त्यांचा आगामी चित्रपट ‘दरबार’ या चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘दरबार’ हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर असणार आहे. त्यांच्या चित्रपटाचा पहिला लूक आजच प्रदर्शित करण्यात आला आहे. यांचा पहिला लूक त्यांच्या चाहत्यांना खुप आवडला आहे. या चित्रपटात रजनीकांत यांनी पोलिसाची भूमिका त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका साकारणार आहे.

हा चित्रपट २०२० रोजी पोंगल सणादिवशी प्रदर्शित होणार असून ‘दरबार’ चित्रपटात रजनीकांत यांनी आयपीएस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादास यांनी केले आहे. तर संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांनी केले आहे. या चित्रपटातून जास्त काही खुलासा केला नसून मुंबई बद्दल कथा असल्याची शक्यता आहे.