रामायणातील अंगदला पाहून सेहवाग म्हणाला – ‘यांच्याकडून शिकलो बॅटिंग, पाय हालवणं मुश्कील नव्हे अशक्यचं’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग रामायण मधील अंगद या पात्राला पाहून भलताच खुश झाला. रविवारी दूरदर्शन वरील लोकप्रिय टीव्ही शो रामायण मध्ये अंगद वर चित्रित प्रसंगाचे प्रसारण करण्यात आले. ज्यात ते रामाचे दूत बनून लंकेला जातात.जिथे त्यांचा पाय कोणीही हलवू शकत नाही. आता जेव्हा पाय न हलवण्याची वेळ आली तेव्हा सेहवागची चर्चा होणे साहजिक आहे. भारताचा उत्क्रृष्ट सलामीवीर विरूने संपूर्ण आयुष्य पाय न हलवता क्रिकेट खेळले. सेहवाग हात आणि डोळयांच्या समन्वयाने जोरदार फटका लावत असे . दूरदर्शवर अंगदला पाहून सेहवागला आपली बॅटिंग आठवली.

अंगद कडून घेतली बॅटिंगची प्रेरणा

भारतीय फलंदाज सेहवाग ने ट्विट करुन सांगितले आहे की , त्याने रामायणातूनच प्रेरणा घेतली . त्याने ट्विटरवर अंगदचा एक फोटो देखील शेअर केला आहे आणि म्हंटले आहे की , हीच ती गोष्ट आहे जिथून मला बॅटिंगची प्रेरणा मिळाली. पाय हलवणे अवघडच नाही तर अशक्य आहे. पुढे अंगदजी रॉक्स।” असे देखील त्याने म्हंटले आहे.

अंगदची कथा काय आहे

रामायणातील कथेनुसार असे मानले जाते की युद्ध टाळण्यासाठी भगवान रामाने अंगदला रावणच्या दरबारात पाठविले. रावणाचा अहंकार मोडून काढण्यासाठी अंगदने रावणाच्या दरबारात सर्व योद्ध्यांना आव्हान दिले की जर कुणालाही जमिनीवरून अंगदचा पाय उचलता आला तर भगवान राम त्याग करतील व निघून जातील. पण दंतकथा अशी आहे की कोणीही अंगदचे पाय उंचावू शकला नाही.

सेहवागची अशीही शैली

अंगदप्रमाणे वीरेंद्र सेहवागही फलंदाजी दरम्यान पाय न हलवण्यासाठी प्रसिद्ध होता. अनेकांनी सेहवागची कमजोरी मानली असली तरी वीरूने आपली शैली कधीच बदलली नाही. एकदा सेहवागने हे सांगितले होते की प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी आपला फुटवर्क बदलण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना काहीही करता आले नाही. एक दशक सेहवाग आपल्या स्टाईलमध्ये फलंदाजी करत राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये दोन तिहेरी शतके ठोकणारा सेहवाग एकमेव भारतीय आहे. त्याने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गेमच्या प्रदीर्घ स्वरूपात दोन तिहेरी शतके ठोकली आहेत.