धक्कादायक ! धावत्या ‘डबल’ डेकर बसमध्ये होते 40 प्रवासी, कंडक्टरकडून महिलेवर बलात्कार

मथुरा : वृत्तसंस्था – यूपीच्या मथुरामध्ये चालत्या बसमध्ये एका महिलेसोबत बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मथुराच्या मान्ट परिसरातील आहे. जेथे एका डबल डेकर बसमध्ये जात असलेल्या महिलेवर बसच्याच कंडक्टरने बलात्कार केला. महिलेने या प्रकरणी तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी कंडक्टरला अटक केली.

ही महिला दिल्लीची रहिवासी असल्याचे सांगितले जात असून डबल डेकर बसमध्ये लखनऊहून दिल्लीला जात होती. चालत्या बसमध्ये कंडक्टरने महिलेवर बलात्कार केला. ही घटना पहाटे ५ च्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. महिलेने स्वतः डायल-११२ ला फोन करून पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केले.

पोलिसांनी दिली घटनेची माहिती
या प्रकरणात एसपी देहत श्रीचंद यांचे म्हणणे आहे की, एका महिलेसह चालत्या डबल डेकर बसमध्ये गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्रार नोंदवून कारवाई केली जात आहे. २९ ऑगस्ट रोजी डायल-११२ वर एका महिलेने बलात्काराची सूचना दिली. महिलेने बसचा नंबर AR 01 L 1052 ही पोलिसांना सांगितला होता. पोलिसांनी उशीर न करता एका आरोपीला अटक केले.

चालत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार
बसमधील लोकांचे म्हणणे आहे की, बस जेव्हा मान्ट टोलजवळ थांबली तेव्हा महिलेने एका मदतनीसासह हाणमारी सुरु केली. या बसमध्ये सुमारे ४० लोक प्रवास करत होते. बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना या घटनेची माहिती नव्हती, जेव्हा महिलेने बलात्काराबद्दल सांगितले तेव्हा प्रत्येकाला धक्का बसला.